Random Video

अंधेरी स्टेशन पासून हायवे पर्यंत नवीन रस्ता | Mumbai Latest News

2021-09-13 0 Dailymotion

अंधेरीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंधेरी स्टेशन पासून हायवे पर्यंत जाणाऱ्यांसाठी 9 मीटर रुंदीच्या नवीन रस्त्याचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. जवळ जवळ 20 वर्षांपासून काही दुकानांच्या अडचणींमुळे हा रस्ता बनवता येत नव्हता. ह्यामुळे अंधेरी- कुर्ला रोड च्या सुरवातीला अंधेरी जवळ च्या
भागावरचा दबाव कमी व्हायला मदत मिळणार आहे. लोकांना आता अंधेरी सबवे जवळून हायवेला जाण्यासाठी तरुण बिल्डींग जवळच्या ह्या नवीन रस्त्याचा उपयोग करता येईल. बुधवारी बीएमसी ने ह्या मार्गासाठी अडथळा ठरत असलेल्या 10 दुकाने आणि एका घराचे स्थलांतर केले आहे.आता रस्त्याचे बांधकाम करून काही दिवसातच हा रस्ता सुरु करण्यात येईल. ज्याने रहदारी सुरळीत होईल. परंतु
बीएमसी ने रस्त्यावर होणार्या पार्किंग ला सुद्धा आळा घालायला हवा ज्याने वाहतुकीला अडचण होणार नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews